आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:आयएफएससीवरून पेटला वाद, केंद्र गुजरातला नेले तरी आजही मुंबईत शक्य : देवेंद्र फडणवीस

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयएफएससीवरून राजकीय वर्तुळात पेटला वाद

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) गुजरातमध्ये नेल्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटले असून काँग्रेस, शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरच याचे खापर फोडत आयएफएससी आजही मुंबईत शक्य असल्याचे म्हटले आहे.

टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, भाजप-शिवसेना सरकारने तेव्हा पुढाकार घेतला होता. परंतु आज जे गळे काढून ओरडत आहेत त्यांनी २००७ ते २०१४ या काळात काय केले, याचे उत्तर आधी दिले पाहिजे. आयएफसी मुंबईत स्थापन करण्यासाठी उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी २००७ मध्ये एक अहवाल केंद्र सरकारला सादर केला. २०१४ पर्यंत तत्कालीन केंद्र व राज्य सरकारने याकडे लक्ष दिले नाही. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला. २०१२ पर्यंत गुजरात आयएफएससीचे सर्व आराखडे तयार झाले आणि कामालाही प्रारंभ झाला. केंद्रावर टीका करताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, मोदी यांचा अट्टहास लपून नाही. गुजरातचे महत्त्व वाढण्यासाठी महाराष्ट्राच्या हितांना मूठमाती देण्याइतपत तत्कालीन फडणवीस सरकारची मजल जाईल, असे वाटले नव्हते.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी तर केंद्र सरकारला आयएफएससी मुंबईतून हलवल्यास मुंबईतून केंद्राला मिळणारा कर रोखला जाईल, अशी धमकीच दिली आहे.