आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'आयआयटी' पवईच्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने जातीभेदाने आत्महत्या केली नसल्याचा अहवाल या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सादर केला आहे. शैक्षणिक कामगिरीमुळे दर्शनने मृत्यूला कवटाळल्याचे समितीने म्हटले आहे.
दर्शनच्या आत्महत्येप्रकरणी पवई पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्यांचाही तपास सुरू आहे. आता पोलिस काय निष्कर्ष काढतात, हे पाहावे लागेल.
नेमके प्रकरण काय?
अहमदाबादचा अवघ्या अठरा वर्षांचा दर्शन सोळंकी हा मुंबईतल्या पवई 'आयआयटी'मध्ये शिकत होता. मात्र, त्याने 12 फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ माजली. पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. दरम्यान, आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल या संघटनेने एक पत्रक काढून त्याने जातीभेदातूनच आत्महत्या केल्याचा आरोप केला होता.
समितीची स्थापना
पवई 'आयआयटी'च्या कॅम्पसमध्ये अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांसोबत भेदभाव होतो. दलित आणि बहुजन विद्यार्थ्यांना हिणवले जाते. या त्रासाला कंटाळून दर्शनने आत्महत्या केल्याचा आरोप आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल संघटनेने केला होता. या प्रकरणी पवई 'आयआयटी'ने 12 सदस्यांची समिती स्थापन केली होती.
अहवालात काय?
दर्शन सोळंकी प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यात दर्शनच्या आत्महत्येमागे शैक्षणिक कामगिरी हे कारण असल्याचे सांगत जातीभेदाचे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे पोलिसांचाही या प्रकरणी तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.