आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनिल:आयएमएपाठोपाठ पतंजलीच्या कोरोना औषधावर महाराष्ट्र सरकारकडूनही बंदी

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य संस्थांकडून प्रमाणीकरण झाल्याशिवाय परवानगी नाही : गृहमंत्री

योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात बंदी घातली आहे. आरोग्य संस्थांकडून कोरोनिलचे प्रमाणीकरण झाल्याशिवाय राज्यात विक्रीस परवानगी मिळणार नाही, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

कोरोनावरील उपचारासाठी बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने ‘कोरोनिल’ नावाचे औषध तयार केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध बाजारात आणण्यात आले. मात्र डाॅक्टरांची अधिकृत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने या औषधावर आक्षेप घेतला आहे. या औषधाला कोणत्याच अधिकृत संघटनेकडून मान्यता नाही आणि औषधाला मान्यता कोणी दिली असा प्रश्न मेडिकल असोसिएशनने उपस्थित केला आहे. त्यापाठोपाठ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली. कोरोनिल औषधाच्या चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने पतंजलीचा दावा फेटाळला
पतंजली आयुर्वेदने कोरोना संसर्ग प्रतिबंधाचे हे औषध बाजारात आणले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार केंद्रीय आयुष मंत्रालयाने आमच्या औषधाला मान्यता दिल्याचा दावा पतंजलीने केला होता. मात्र काेराेनासाठी आम्ही कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचआे) म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...