आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:‘मेड इन महाराष्ट्र’साठी नवा प्रकल्प सादर केल्यास त्वरित कार्यवाही; सीआयआय बैठकीत मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांना शब्द

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मजुरांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या औद्योगिक क्षेत्रातील जागांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावे - उद्योग मंत्री

राज्यातील उद्योजकांनी ‘मेड इन महाराष्ट्र’चा दबदबा वाढवण्यासाठी राज्याची नवी ओळख निर्माण करणारा एक नवा प्रकल्प सादर करावा, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या वतीने आयोजित व्हीसीमध्ये उद्योजकांना विश्वास दिला.

या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योजक सुनील माथूर, जमशेदजी गोदरेज, नौशाद फोर्ब्ज, हर्ष गोयंका, बी. त्यागराजन यांनी भाग घेतला. उद्योगांना लागणाऱ्या कुशल आणि अकुशल कामगारांची कमतरता भासणार नाही. दोघांमधील दुवा म्हणून शासन काम करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले.

स्थानिकांना प्राधान्य द्या

स्थलांतरित मजुरांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या औद्योगिक क्षेत्रातील जागांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. कामगारांची समस्या सोडवण्यासाठी राज्यात आता औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे. यामुळे नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे यांच्यामधील दरी दूर होणार आहे, अशी आशा देसाई यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...