आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 'Immediate Action Must Be Taken Against This Woman, It Is A Matter Of Honor For Mumbai Police'; Sanjay Raut Shared The Video And Expressed His Anger

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांची मागणी:'या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे'; संजय राऊतांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका पोलीस कर्मचाऱ्याला एका महिलेकडून भर रस्त्यात मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला.

राज्यभरात लॉकडाऊन लागले होते, सर्व लोक घरात होते, तेव्हा पोलिस जीव धोक्यात घालून सामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर उभे होते. आपण त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानीत करतो. मात्र मुंबईच्या रस्त्यावर एका महिलेने चक्क पोलिसालाच मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसाला ही महिला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

एका पोलीस कर्मचाऱ्याला एका महिलेकडून भर रस्त्यात मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. आता हा व्हिडिओ पाहून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिसाला मारहाण करणाऱ्या या महिलेवर तात्काळ कारवाई करायलयाच हवी अशी मागणी केली आहे.

'या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी. मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे..Take Action..'अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे.