आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला शुक्रवारी पत्र लिहून उपाययोजना राबवण्याची सूचना केली. तर महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे केंद्र सरकारने अधोरेखित केले आहे. त्यामुळे राज्यात विशेषत: या सहा जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याची सूचना केंद्राने केली आहे. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे पत्र लिहिले आहे.
राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना हे पत्र लिहिले आहे. देशात गेल्या तीन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या खालावली असताना आठवड्यापासून वाढत असल्याचे दिसून आल्याकडे लक्ष वेधले.
देशभरात गेल्या पंधरा दिवसांत कोरोना रुग्णसंख्या १५ हजारांच्या घरात पोहोचली आहे, तर पॉझिटिव्हिटी रेट ०.७३ टक्क्यावर पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. आठवड्याभरापूर्वी पॉझिटिव्हिटी रेट ०.५२ % इतका होता. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात २ हजार ४७१ नवीन रुग्ण आढळून आले.
काय आहेत सूचना
- कोविडकाळातील योग्य वर्तन
- नव्याने उद्भवणाऱ्या कोविड - १९ प्रकरणांवरील बारकाईने लक्ष
- मार्गदर्शनाप्रमाणे समाधानकारक चाचण्या करा
- संसर्ग पसरत असल्याचे आधीच जाणून घेऊन इशारा देण्यासाठी आरोग्य सुविधेच्या ठिकाणी इन्फ्लुएन्झा (आयएलआय) अथवा संसर्गाबाबत निरीक्षण करणे
वाढती रुग्णसंख्या
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर येथे रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारने या ठिकाणी दक्षता देण्याची गरज असल्याचे मत या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक कोविड केस व संरक्षणार्थ साइट्सकडून सॅम्पल गोळा करणे, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विहित सॅम्पलकरिता जेनोमिक सिक्वेन्सिंग.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.