आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेररचना:समांतर जलवाहिनी योजनेची ‘वाॅर रूम’द्वारे अंमलबजावणी, राज्यातील 36 पायाभूत प्रकल्पांसाठी ‘वॉर रूम’ची फेररचना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ३६ पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या योजनाबद्ध व वेगवान अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या वॉर-रूमचे सह-अध्यक्ष असून त्यांच्यासह एकूण दहा सदस्यांचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, वेस्टर्न डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर, वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस-वे, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्प, औरंगाबाद पाणी पुरवठा प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील टनेलचे काम यावर वाॅर रूममधून लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाणे कोस्टल रोड, पुणे रिंग रोड, वर्सोवा-विरार लिंक रोड, रोहा-दिघी रेल्वे लाइन, त्याशिवाय मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मेट्रोच्या विविध कामांवरही देखरेख ठेवली जाणार आहे.

राधेश्याम मोपलवार कार्यकारी प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पाचे महासंचालक असलेले निवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे वाॅर रूमचे कार्यकारी प्रमुख असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...