आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळीच दक्षता:उद्धवसेनेच्या आमदारांची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक; संभाव्य फुटिरांची कानउघाडणी होण्याची शक्यता

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धवसेनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार, खासदारांची महत्त्वाची बैठक १३ मे रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धवसेनेत आणखी फाटाफूट होण्याची चर्चा सुरू झाली आहे. काही जण आमच्या संपर्कात असल्याचा दावाही शिंदेसेनेकडून होत आहे.

भाजपच्या गोटातूनही उद्धवसेनेतून काही आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत मार्गदर्शन करतील. संभाव्य फुटिरांची कानउघाडणी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, फाटाफुटीचा आणि बैठकीचा काहीही संबंध नाही. आगामी विधानसभा, मनपा, जि.प. निवडणुकीसाठी कशी मोर्चेबांधणी करावी. जिल्हास्तरावर विरोधकांना कसे उत्तर द्यावे, याचे मार्गदर्शन होणार असल्याचा दावा उद्धवसेनेकडून होत आहे.