आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अंतिम वर्षातील परीक्षा अखेर रद्द, कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता घेतला महत्त्वाचा निर्णय, राज्य सरकारने दिली माहिती

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात संसर्ग वाढत आहे. हा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी लॉकडाऊन लागल्यानंतर दहावी-बारावीचे शेवटचे पेपर रद्द करण्यात आले होते. यानंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. यावर अनेकांची मतमतांतरे होते. आता अखेर परीक्षा रद्द करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...