आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या:महत्वाची बातमी, दहावी, बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न - वर्षा गायकवाड

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी, बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल.

पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आल्या. पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीसाठी परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा निकाल हा मागील इयत्तेच्या मूल्यांकनाच्या आधारे परीक्षा न घेताच जाहीर करण्यात आला होता

बातम्या आणखी आहेत...