आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • In 5 Days The Counting Of Two And A Half Crores Of Donations In Lal Bagh Raja's Donation Box Is Complete; Queues Of Ganesha Devotees To See The King

5 दिवसात लालबागच्या राजाला 2.5 कोटींचे दान:दानपेटीची मोजणी पूर्ण; राजाच्या दर्शनाला गणेशभक्तांच्या रांगा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा राज्यात गणेशोत्सव धडाक्यात साजरा होत आहे. मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू होऊन पाच दिवस झाले असून, लालबागच्या राजाची दानपेटीत भक्तांनी भरभरून दान दिले. आज पाचव्या दिवशी दानाची मोजणी पूर्ण झाली. या पाच दिवसांत दानपेटीत तब्बल 2.50 कोटींचे दान जमा झाले.

नवा विक्रम चार दिवसांतच

यंदा लालबागच्या राजाने एक नवा विक्रम केला. चार दिवसांतच लालबागचा राजा मंडळात एक कोटींपेक्षाही अधिकची देणगी जमा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चार दिवसांत तब्बल दीड कोटी रुपये इतकं भरघोस दान गणेशभक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केले. त्यानंतर पाचव्या दिवशी दानात भरघोस वाढ झाली.

अडीच किलो सोने दान

5 दिवसात सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये इतके दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झाले असून, यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी देखील भक्तांनी अर्पण करण्यात आली आहे. जवळपास अडीच किलो सोने आणि 29 किलो चांदीचे दान लालबागच्या राजाच्या दानपेटी अर्पण करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आकडे बोलतात..

पैसे24950000 रुपये
सोने2518.780 ग्रॅम *
चांदी29164.000 ग्रॅम *

राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर पासून गणेशभक्तांनी लालबाग परिसरात गर्दी केली होती. दरम्यान, लालबागच्या राजा प्रमाणेच लालबाग परिसरात असलेल्या इतर प्रसिद्ध मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...