आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • In 50% Of The Space Of The Shop Sign, The Name Should Be Written In Marathi First, Then Other Languages Can Be Used In The Rest Of The Space, State Government Orders.

पाट्यांवर फक्त मराठीच नाही:आधी मराठीत मग इतर भाषेत चालेल नाव, राज्य सरकारचा आदेश; पाट्या बदलण्यासाठी महिन्याची मुदत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी आता नव्याने एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दुकानांच्या पाट्या बदलल्या नाहीत तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

मराठी पाट्या व मराठी विषय अनिवार्य करण्याच्या संदर्भात सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठी भाषा विभागाने महत्त्वाचे कायदे विधिमंडळात मंजूर करून घेतले व त्या कायद्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीत करण्याच्या दृष्टीने प्रथम सर्व दुकानदारांना आवाहन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. विधिमंडळात कायदा केल्याने आता मराठी भाषेत पाट्या हा नियम झाला आहे. मराठीत पाट्यांच्या नियमांची अंमलबजावणी महापालिका व नगरपालिकांवर सोपवण्यात आली आहे.

मराठी पाट्यांच्या आदेशाचा प्रवास...
राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्यात हा अध्यादेश काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात ३१ मे २००८ मध्ये काढण्यात आला होता. त्यानंतर काही संघटनांनी आक्रमक होत काही दुकानांच्या पाट्या तोडल्या. या अध्यादेशात काही पळवाटा होत्या. विद्यमान महाआघाडी सरकारने १३ जानेवारी २०२२ रोजी नव्याने आदेश काढत पळवाटा बंद केल्या.

पळवाटेचा फायदा घेत होते दुकानदार
मूळ अध्यादेशामध्ये १० पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना मराठी पाट्यांची सक्ती नव्हती. त्यामुळे ही पळवाट वापरून अनेक दुकानदार हव्या त्या भाषेत पाट्या लावत होते. यावर सरकारने जानेवारी २०२२ मधील अध्यादेशात ही पळवाट बंद केली. तरी अनेक ठिकाणी मराठी पाट्या दिसत नाहीत. यावर राज्य सरकारने आता नव्याने तिसऱ्यांदा आदेश काढले.

बातम्या आणखी आहेत...