आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेची गुंडगिरी:शाळेची जमीन हडपण्याची तक्रार पोलिसांना केली तर महिलेने केली वाईट पध्दतीने मारहाण; चार जणांवर केस

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी एका महिलेसह चार लोकांविरोधात केस दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मुंबई जवळील उल्हासनगरमध्ये बुधवारी जमिनीच्या वादात महिलेने एका व्यक्तीला वाईट पद्धतीने मारहाण केली. आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी एका महिलेसह चार लोकांविरोधात केस दाखल करुन तपास सुरू केला आहे.

ज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलली आहे त्यामध्ये कमलेश निकम, संतोष पांडे, मनीष हिंगोरानी आणि एका महिलेचा समावेश आहे. उल्हासनगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी महिलेने एका भांड्याच्या दुकानात घुसून प्रकाश तलरेजा नावाच्या व्यक्तीला वाईट पध्दतीने मारहाण केली आणि सोबतच्या लोकांनी याचा व्हिडिओ बनवला.

शाळेची जमीन हडपण्याचा आरोप
प्रकाश तलरेजा यांनी आरोप लावला आहे की, महिलेला त्यांच्या झुलेलाल शाळेची जमीन हडपायची आहे. यासाठी अनेक दिवसांपासून त्यांना धमक्या मिळत होत्या. तलरेजा यांनी याची तक्रार काही दिवसांपूर्वीच उल्हासनगर ACP कार्यालय आणि महानगर पालिका प्रशासनाकडे केली होती. याच गोष्टीवरुन नाराज होत महिलेने त्यांच्यावर हल्ला केला आहे. सध्या त्या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...