आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • In Bhiwandi, While Filling Up The Gram Panchayat Election Forms, There Was A Scuffle Between The Activists Of Both The Parties, Throwing Chairs And Confusion.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना आणि NCP कार्यकर्त्यांमध्ये मारहाण:भिवंडीमध्ये ग्राम पंचायत निवडणुकांचे अर्ज भरत असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, खुर्च्या फेकून गोंधळ

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणाविषयी गणेश गुलवीकडून शांतिनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून सरकार आहे. मात्र स्थानिक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना मंगळवारी संध्याकाळची आहे. मात्र याचा व्हिडिओ आज समोर आला आहे. यामध्ये कार्यकर्ते एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत.

ही घटना भिवंडी तालुक्यातील निम्बवाली गावातील आहे. काही दिवसात होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकांविषयी मंगळवारी शिवसेना आणि एनसीपीचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी गेले होते. निम्बवाली ग्राम पंचायत निवडणुकीत एनसीपीचे तालुका अध्यक्ष गणेश गुलवी आणि शिवसेनेचे प्रवीण गुलावी यांच्यात भांडण झाले.

बॅनर्स लावण्यावरुन सुरू झाला होता वाद
निवडणूक प्रचारामुळे एक दिवसापूर्वीच गणेश गुलवी यांच्याकडून प्रवीण गुलावी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कंप्लेंटमध्ये म्हटले होते की, गणेश गुलवीने आचारसंहितेचे उल्लंघन करत संपूर्ण गावात पोस्टर्स लावले आहे. याच गोष्टींमुळे दोन गटांमध्ये वाद झाला आणि अर्ज भरण्यादरम्यान झालेल्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले.

आयोगाकडूनही केस दाखल करण्यात आली
या प्रकरणाविषयी गणेश गुलवीकडून शांतिनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिटर्निंग ऑफिसर डॉ. सुनील भालेराव यांनीही दोन्ही पक्षांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची केस दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...