आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील १३ जिल्ह्यांतील २७१ पैकी २३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी हाती आले. यातील ३३ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या. शिंदे गट, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आम्हीच अधिक जागा जिंकल्याचा दावा करत आहेत. दरम्यान, भाजप ८२, शिंदे गट ४०, राष्ट्रवादी ५३, शिवसेना २७, काँग्रेस २२ आणि इतर ४ अशा २३८ जागांवर विजयी झाल्याचे सांगत आहेत. २३८ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी ७८ टक्के मतदान झाले. शुक्रवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दिग्गजांना धक्के बसले. सोलापूर जिल्ह्यात माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या १५ वर्षांच्या वर्चस्वाला धक्का बसून मनगोळी ग्रामपंचायत त्यांच्या हातातून निसटली. चिंचपूर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाला ७ पैकी ७ जागा मिळाल्या. कर्जत तालुक्यात तिन्ही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेऊन भाजपच्या राम शिंदेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना धक्का दिला आहे.
साेलापुरात सुभाष देशमुख, तर कर्जतमध्ये रोहित पवारांना धक्का - वडगाव कोल्हाटी : बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार संजय शिरसाट यांच्या गटाचे ११ तर भाजपचे २ आणि शिवसेनेचे ४ उमेदवार निवडून आले. - औरंगाबाद जिल्हा : पैठण ७ पैकी ६ जागी आ.संदिपान भुमरे (शिंदेसेना) यांच्या ताब्यात, १ राष्ट्रवादी - गंगापूर : २ ठिकाणी स्थानिक पॅनल, वैजापूर : २ ठिकाणी स्थानिक पॅनल, सिल्लोड : एकूण ३ ठिकाणी शिंदे सेना आ.सत्तार यांचे वर्चस्व - बीड : १३ पैकी ६ राष्ट्रवादी, ४ भाजप, २ शिवसेना, १ इतर - जालना : २८ पैकी १५ शिवसेना, २ शिंदेसेना, १३ जागांवर भाजपचा दावा.
राज्यातील जनतेने युतीला पसंती दिली : चंद्रकांत पाटील जनतेेने युतीला पसंती दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या विजयाचा विचार केला तर युती आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा पुढे असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
२५ जि.प.सह २४८ पंचायत समित्यांची निवडणूक स्थगित
मुंबई | राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी स्थगित करण्यात आली. आरक्षणाची अंतिम अधिसूचना ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर १३ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ८ ऑगस्ट रोजी, तर १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील, असे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.