आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीया विशेष:अक्षय्य तृतीयेच्या मृहूर्तावर हापूस आंब्याला जास्त मागणी, यंदा हापूस आब्यांचे घटले दर

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीयेला फळांचा राजा बाजारपेठेत दाखल झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून आंबा उत्पादकांच्या बाबतीत एक गोष्ट मनासारखी झाली आहे. या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम आंबा उत्पादनावर अधिक झाला आहे. यामध्ये अवकाळी पावसाने लावलेली हजेरी, वाढते ऊन अशा गोष्टींमुळे आंबा बाजापेठेत विक्रीसाठी दाखल होतो की नाही असा प्रश्न आंबा विकणाऱ्या उत्पादकांना पडला होता. पण तसे झाले नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. इतकच नव्हे तर नागरिकांनी हापूस आंब्याची चव चाखता आली आहे. यापुळे विक्रेत्यांना आणि नागरिकांना आनंद झाला आहे.

कोकण, पुणे, मुंबई आणि वाशी या ठिकाणीहून वाढली हापूस आंब्याची आवक
कोकण, पुणे, मुंबई आणि वाशी मार्केटमध्ये आवक वाढली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दरात घटही झाली आहे. 800 ते 1 हजार वरील हापूसची पेटी 500 ते 600 पर्यंत मिळाल्याने ग्राहकांमध्येही समाधान आहे.

आवक वाढल्याने हापूस आंब्यात घसरण
या वर्षी आंबा उत्पादनात घट झाल्यामुळे केवळ मुख्या बाजापेठेत आंब्याची आवक सुरु होती. अशे असल्याने अक्षय्य तृतीयेनंतरच ग्राहकांना आंब्याची चव चाखायला मिळेल की नाही असा अंदाज होता. पण गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात घसरण झाली आहे. उत्पादकांना फटका बसला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच 200 ते 300 रुपयांनी पेटीमागे दर घसरले आहे.

कोकणातून होते आहे सर्वाधिक आवक
हापूस आंबा म्हटली की लगेचच कोकणाची आठवण होते. मुंबईच्या बाजारपेठेमध्ये दिवसाकाठी 85 हजार पेट्यांची आवक झाली असून यामध्ये सर्वाधिक आंबा हा कोकणातून दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...