आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक:महाराष्ट्रात रोज 15 हजार परप्रांतीय कामगारांचा परतीचा ओघ झाला सुरू, येत्या काही दिवसांत संख्या आणखी वाढेल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई परिसरात 11 हजार, उर्वरित भागात येताहेत 5 हजार कामगार

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील उद्योगधंदे नव्या जाेमाने सुरू हाेत आहेत. त्यामुळे परराज्यात गेलेले कामगार पुन्हा परत येत आहेत. मुंबई परिसरात सुमारे ११ हजार, तर उर्वरित भागात ५ हजार कामगार दररोज परतत आहेत. येणाऱ्या सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी व होम क्वॉरंटाइन करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परत गेले हाेते. ते आता मोठ्या संख्येने परत येत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज १५ हजारांच्या वर कामगार येत आहेत. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. या कामगारांची नोंद घेऊन त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी पाठवण्यात येते, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

येत्या काही दिवसांत परतणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल

गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या ४ ते ५ हजार, तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात अकरा ते साडेअकरा हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे. सर्व उद्योग, व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर परत येणाऱ्या कामगारांची संख्या वाढेल. त्या वेळीदेखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...