आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:राज्यात 17 ऑगस्टपासून सुरु होणार ग्रामीण व शहरी भागातील शाळा; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा सुरू करण्यापूर्वी ही घ्यावी लागणार काळजी

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शाळा महाविद्यालये बंद होते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महत्वाचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार, सध्या राज्यभरात महत्वाचे वर्ग सुरु आहे. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने ही अनेक जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 ते 7 तर शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसे परिपत्रकदेखील शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी ही घ्यावी लागणार काळजी

  1. शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  2. शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
  3. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
  4. कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
  5. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
बातम्या आणखी आहेत...