आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसला पुरुषार्थ:मुंबईत मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला मारहाण; हे तर राज ठाकरेंच्या पक्षाचे गुंड, काँग्रेससह राष्ट्रवादीची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या मुंबादेवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्याची मुजोरी इथेच थांबत नसून, त्याने यावेळी महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

नेमके प्रकरण काय?

मुंबादेवीत गणपती मंडप उभारण्यावरुन वाद झाल्यचे समजते. याठिकाणी बुधवारी गणेशोत्सवानिमित्त मंडप उभारण्याचे काम सुरू होते. याच ठिकाणी असलेल्या एका मेडिकलसमोर पदाधिकारी बांबू लावण्यासाठी गेले. त्यावेळी मेडिकल चालक प्रकाश देवी यांच्याकडून विरोध करण्यात आला. त्यावेळी मनसेचा उपविभाग प्रमुख विनोद अरगिले यांनी महिलेला मारहाण केली.

महिलांनीही आदर राखावा

मारहाणीवरून दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आल्या आहेत. विनोद अरगिले यांनी आपण पोलिसात तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, व्हायरल व्हिडिओत एकच बाजू दिसून येत आहे. महिलेनेही आम्हाला शिवीगाळ केली. ती महिला आमच्या अंगावर धावून गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्वतःच्या बचावासाठी काहीच करायचे नाही का? आम्ही महिलांचा आदर करुच पण त्यांनीही आमचा आदर राखणे गरजेचे आहे, असेही मनसे पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.

कारवाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे याबाबत म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात मनसेच्या कार्यकर्त्याने ज्येष्ठ महिलेला मारहाण करण्यात आली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी कामाठीपुरा येथे गणेशोत्सवादरम्यान एका महिलेच्या कानशिलात लगावण्यात आली. यासारखे दुसरे दुर्दैव असू शकत नाही. त्या व्यक्तीविरोधात कारवाई व्हावी. तसेच मनसेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या पक्षाचा गुंड

काँग्रेसचे संजय निरुपम यांनी देखील मनसेवर टीका केली आहे. ते म्हणाले, हिंदुत्वाच्या नव्या भूमिकेचे हे सध्याचे स्वरूप आहे. राज ठाकरेंच्या पक्षाच्या गुंडाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केला. गुंडगिरी करून मनसेला आपला गमावलेला जनाधार परत मिळवायचा आहे का? असा सवालही त्यांनी मनसेला विचारला आहे. तसेच गृहमंत्री फडणवीस यांनी तातडीने कारवाई करून वृद्ध महिलेला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...