आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा कठोर निर्णय:मुंबईतील बस कंडक्टरला एका वर्षाचा तुरंगवास, 15 हजाराचा दंड; 13 वर्षाच्या मुलीसोबत करायचा अश्लील गोष्टी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीने शाळेत जायला नकार दिल्यामुळे आईला आला संशय

मुंबईतील एका विशेष न्यायालयाने 13 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील गोष्टी करण्याच्या आरोपाखाली बस कंडक्टरला एक वर्ष तुरंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संबंधित प्रकरणातील आरोपी चंद्रकांत सुदाम कोळीला POCSO कायद्याच्या कलग 12 अंतर्गत दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीला 15 हजाराचा दंड ठोठावला असून तो दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

प्रकरण काय आहे?
ही घटना जुलै 2018 ची असून मुंबईत घडली आहे. पूर्व उपनगरमध्ये राहणारी एक 13 वर्षांची मुलगी दररोज सरकारी बसने शाळेत ये-जा करत होती. परंतु, घटनेच्या दिवशी बसमध्ये 2 ते 3 जण बसलेली होते. दरम्यान, बस कंडक्टर चंद्रकांत कोळी पीडीत मुलीजवळ येऊन बसला आणि तुला सेक्सबद्दल काही माहित आहे का? असे विचारु लागला.

यावर पीडीताने मला असे प्रश्न विचारु नका म्हणून खडसावले. कंडक्टर काही वेळासाठी निघून गेला. परंतु, परत आल्यावरदेखील त्याने त्या पीडीताला असेच प्रश्न केले. त्यावर पीडीतानेदेखील मला असे काही विचारु नका म्हणून म्हटले व बस स्टॉप येताच ती खाली उतरली.

मुलीने शाळेत जायला नकार दिल्यामुळे आईला आला संशय
काही दिवसांनंतर मुलीने शाळेत जायला नकार दिल्यामुळे आईने तीला विचारले असता तीने माहिती दिली नाही. परंतु, आईने पीडीताच्या मित्र मैत्रिनींना विचारले असता तीला खरे कारण कळाले. त्यानंतर आईने पीडीताला घेऊन बस डेपोत आली आणि आरोपीची ओळख करायला लावली. त्यानंतर आईने त्या आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

आरोपीला अवघ्या 12 दिवसांत मिळाला जामीन
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी चंद्रकांत सुदाम कोळी केवळ 12 दिवस तुरूंगात गेला होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. कोळीच्या वकिलांनी शिक्षा स्थगितीसाठी न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे होता. त्यानंतर न्यायालयाने हे मान्य करूनही शिक्षा 30 दिवसांसाठी तहकूब केली होती.

बातम्या आणखी आहेत...