आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी रात्री मुंबईच्या दहिसर पूर्वेतील एसएन दुबे रोडवरील श्रीजी इंडस्ट्रियल कंपनीजवळ एका मद्यधुंद तरुणाने गोंधळ घातला. हातात चाकू घेऊन तो लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला हे करताना पाहून स्थानिक लोकांनी प्रथम त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपीला पकडण्यासाठी करावे लागले कठोर प्रयत्न
ही घटना रविवारी रात्री 9.30 च्या सुमाराची आहे. दहिसर पोलिसांच्या एका पथकाने आरोपीला अटक केली आहे. मात्र, नशेत असल्याने पोलिसांना आरोपींला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. तो हातात चाकू घेऊन त्याला पकडण्यासाठी येणाऱ्या लोकांवर तो वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.
या घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवरून रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो तरुण शस्त्रासह त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कसा हल्ला करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.