आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा विराट गणेशाेत्सव:मुंबईत गणेश भक्तांचा उत्साह गगनाला भिडला; भाविकांची दोन वर्षांनी मोठी गर्दी होणार

मुंबई / अजय मिश्रा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्सवांचा श्रीगणेशा बुधवार, 31 ऑगस्टला गणरायाच्या स्थापनेसह होईल. देशातील प्रत्येक शहर-गल्लीत धूमधाम आहे. स‌र्वाधिक उत्साह मायानगरी मुंबईत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर प्रथमच उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्तरावर विराटतेची झलक दिसत आहे. यंदा गणेश मंडळांसाठी विक्रमी ३,२५५ अर्ज आले, तर मूर्तींची उंची 22 फुटांपर्यंत आहे. पर्यावरणपूरक ते मूर्तींच्या सजावटीसाठी सोने-चांदीचे दागिनेही तयार केले जात आहेत.

दादर, चिंचपोकळी, करी रोड, माटुंगा, शिवडी, प्रभादेवी या भागांत मूर्ती विक्रीसाठी तंबू लागले आहेत. कुठे १०० तर कुठे १७० मूर्ती. सर्व बुक झाल्या. किंमत दीड हजार ते १८ हजारांपर्यंत. सजावट, कारागिरीनुसार अडीच लाखांपर्यंतच्याही मूर्ती आहेत. तयारी अंतिम टप्प्प्यात आहे. भक्तांचा उत्साह गगनाला भिडला आहे. मुंबईत गणरायाच्या स्वागतासंबंधीचा हा भास्कर ग्राउंड रिपोर्ट :

जीएसबी सेवा मंडळ :

मूर्तीला 35 कोटींचे दागिने घालणार
किंग्ज सर्कलवर सर्वात श्रीमंत मंडप. मंडप १ लाख चौरस फुटांचा आहे. गणपतीच्या मूर्तीस ६६ किलो सोने (३३ कोटी रु.), २९५ किलो चांदीचे (१.६० कोटी रु.) दागिने घातले जातील. मंडपापासून ते भाविकांपर्यंतचा विक्रमी ३१६. ७५ कोटी रुपयांचा विमा काढलेला आहे.
या मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी २०१६ मध्ये ३०० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला होता. ४ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे, तोपर्यंत दागिन्यांत आणखी वाढ होऊ शकते. मूर्तीचे प्रथम विराट दर्शन २९ ऑगस्टला होईल. रोज २ लाख भाविक येतील, अशी अपेक्षा आहे. सजावटीसाठी ३ ते ४ टन फुले लागतील. फुले मुंबईबरोबरच बंगळुरू, नाशिक, चेन्नई येथून मागवली जात आहेत. पाच दिवसांत २.७५ लाख नारळ येतील अशी शक्यता आहे. आयोजनावर ५ ते ६ कोटी रुपयांचा खर्च होईल. रोज सकाली ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भंडाराही होईल. प्रवेशही डिजिटल आहे. वेगवेगळ्या पूजा-दर्शनासाठी ५०० रुपयांपासून ते ६ लाख रुपयांपर्यंतची पावती घेतली जाऊ शकते. या पावतीवर क्यूआर कोड आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतरच प्रवेश मिळून दर्शन घेता येईल.

लालबागचा राजा :

राम मंदिरा- सारखे गेट, सेलिब्रिटीही येणार
व्हीव्हीआयपींचा राजा. मंडपाचे शिखर, गेट अयोध्येच्या श्रीराम मंदिरासारखे आहे. मुख्य गेट मिर्ची गल्लीत. येथूनच अमिताभ बच्चनसारखे सेलिब्रिटीज दर्शन घेतील. २४० कॅमेरे, ३२ फोन, २५० गार्ड, ३५०० कार्यकर्ते तैनात असतील. ५ कोटी खर्च.

चिंचपोकळीचा चिंतामणी :

यक्षिणी मंदिर थीमचा मंडप
१०३ वर्षे जुन्या मंडपातील गणरायाची मूर्ती दर्शनासाठी खुली केली आहे. मूर्ती २२ फुटांची आहे. मंडप यक्षिणी मंदिराच्या थीमवर आहे.
उत्सवकाळात चित्रपटांतील दिग्गजांसह सुमारे २ लाख लोक येतात. आयोजनावर ८० लाख रुपये खर्च होतात.

मुंबईचा राजा: साडेपाच किलोचा हार

1 किलोचा सोन्याचा हात
बाहेर काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती आहे. २२ फूट उंच गणराय विश्वकर्मा अवतारात आहे. सोन्याचा साडेपाच किलोचा (२.७५ कोटी रु.) हार असेल. आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेचा एक हात एक किलो सोन्याचा (५० लाख रु.) आहे. एक किलो सोन्याचे पायही असतील.

सिद्धिविनायक : राेज 2 ते अडीच लाखांपर्यंत भाविक येतील
मंदिरात सभामंडपाजवळ पारंपरिक सव्वादोन फुटांची मूर्ती स्थापन केली जाईल. दररोज २ ते अडीच लाख भाविक येतील. यंदा विसर्जन शिवाजी पार्क चौपाटीवर होईल. मूर्तींचे सन्मानासह विसर्जन करता यावे यासाठी गिरगाव ते माहीमपर्यंत ७ चौपाट्यांवर २ हजार स्वयंसेवक तैनात असतील. यंदा विसर्जन सातव्या दिवसाऐवजी नवव्या दिवशी होईल.

बातम्या आणखी आहेत...