आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅक्टिंगच्या नावाखाली फसवणूक:मुंबईत तीन कास्टिंग डायरेक्टर्सला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला विकताना पकडले, 3.5 लाख रुपयांमध्ये केला होता सौदा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशाप्रकारे आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस

चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने स्ट्रगलिंग अ‍ॅक्ट्रेसला देहविक्री व्यापारात ढकलल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने 3 कास्टिंग डायरेक्टर्सना अटक केली आहे. या कारवाईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला साडेतीन लाखात विकले असल्याचेही तपासात समोर आले आहे. सदरील घटना गुरुवारी रात्रीची आहे.

समाजसेवा शाखेचे डीसीपी राजू भुजबळ यांनी सांगितले की, 14 वर्षांच्या मुलीची विक्री करणार असल्याची खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून त्यांच्याकडे पाठवले आणि कास्टिंग डायरेक्टर आशिष पटेल, विनोद अनेरिया आणि मो.शेख यांना सौदा करताना पोलिसांनी अटक केली.

अल्पवयीन असल्याने मुलीसाठी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली

सौद्यादरम्यान एका आरोपीने म्हटले की, ते चौदा वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी पुरवतील आणि ते प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपये घेतील. एका आरोपीने सांगितले की - ते चौदा वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी पुरवतील आणि ते प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपये घेतील. आरोपी हे वारंवार सांगतच राहिले, कारण मुलगी चौदा वर्षांची आणि अल्पवयीन असल्याने तिच्यासाठी प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली जाईल.

अशाप्रकारे आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस

या व्यवहारानंतर पोलिस पथकाने अंधेरी येथील हॉटेलमध्ये सापळा रचला. येथेच पीडितेसोबत आरोपी कास्टिंग डायरेक्टरला बोलावले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका व्यक्तीला ग्राहक म्हणून अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील रेस्टॉरंटमध्ये पाठवले. तीन आरोपी कास्टिंग डायरेक्टर त्या अल्पवयीन मुलीसह तेथे पोहोचताच पोलिस पथकाने त्वरित तिघांना अटक केली आणि पीडित मुलीला त्यांच्या तावडीतून सोडवले.