आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना राज्यात:महाराष्ट्रात एका दिवसांत आढळले 57,074 कोरानाबाधीत रुग्ण; या आकड्यांची इतर देशांशी तुलना केल्यास स्वतः भारत आणि फ्रान्स पुढे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र 10 व्या नंबरवर

महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 57,074 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले असून या आकड्यांची तुलना इतर देशांशी केल्यास महाराष्ट्राची संख्या भारत आणि फ्रान्स देशाच्या ही पुढे जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे.

जगात पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र 10 व्या नंबरवर
महाराष्ट्र राज्य पॉझिटिव्ह रुग्ण येण्याच्या यादीत जगात 10 स्थानावर आहे. त्याआधी अमेरिका, ब्राझील, भारत, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, इटली, तुर्की आणि स्पेन आदी देशांचा समावेश आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 57,074 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून त्यात 222 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत 30 लाख 10 हजार 597 लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात आले असून यामध्ये 55,878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...