आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोप:इतर राज्यांमध्ये 17 हजार किमीचे रस्ते मंजूर, महाराष्ट्राचे अजून प्रस्तावच नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा आराेप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो
  • विराेधी पक्षनेते आज नाशिक, जळगाव दाैऱ्यावर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील निधीचा महाराष्ट्राला फायदा मिळावा, ग्रामीण रस्त्यांचे व्यापक जाळे निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार असला तरी अद्याप तसे प्रस्तावच राज्याकडून गेलेले नाहीत. दुसरीकडे अन्य राज्यांमध्ये सुमारे १७ हजार किमीचे रस्ते मंजूर झालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आढावा घेऊन हे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रातून केली आहे.

फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या तिसर्‍या टप्प्यात सुमारे १.२५ लाख किलोमीटरचे रस्ते उभारण्यात येणार आहेत. बाजार समित्या, शाळा आणि रुग्णालये यांना चांगली कनेक्टिव्हिटी असावी, हा मुख्य उद्देश यात आहे. या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी ६५५० कि.मी.चे उद्दिष्ट निश्चित झाले आहे. यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा टप्पाही पूर्ण करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापर्यंत यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले होते. परंतू दुर्दैवाने महाराष्ट्राने आपले प्रस्ताव अद्यापही सादर केलेले नाहीत. अन्य राज्यांत १७ हजार किमीच्या कामांना आतापर्यंत मंजुरी मिळाली असताना महाराष्ट्रात प्रस्ताव सुद्धा सादर होऊ नये, हे दुर्दैवी आहे. ग्रामीण भागात मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न असल्याने हे प्रस्ताव आधीच सादर झाले असते, तर आज त्या रोजगारसंधी कोरोनाच्या काळात अतिशय महत्त्वपूर्ण राहिल्या असत्या.

करण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले होते. परंतू दुर्दैवाने महाराष्ट्राने आपले प्रस्ताव अद्यापही सादर केलेले नाहीत. अन्य राज्यांत १७ हजार किमीच्या कामांना आतापर्यंत मंजुरी मिळाली असताना महाराष्ट्रात प्रस्ताव सुद्धा सादर होऊ नये, हे दुर्दैवी आहे. ग्रामीण भागात मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न असल्याने हे प्रस्ताव आधीच सादर झाले असते, तर आज त्या रोजगारसंधी कोरोनाच्या काळात अतिशय महत्त्वपूर्ण राहिल्या असत्या.

विराेधी पक्षनेते नाशिक, जळगाव दाैऱ्यावर आज

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवार दि. ८ आणि गुरुवार दि. ९ जुलै रोजी नाशिक, जळगाव आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. ८ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक कोविड रुग्णालयाला भेट देतील. त्यानंतर कोविड केअर सेंटर, बिटको येथे चर्चा करतील. विभागीय आयुक्तांकडून आढावा घेतील.  

0