आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानापमान नाट्य:महाजॉब्सच्या जाहिरातीत सेना-राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसला मात्र पद्धतशीरपणे फाटा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आघाडीचे सरकार असल्याची काँग्रेसने दिली आठवण

महाजाॅब्स या पोर्टलच्या जाहिरातीत काँग्रेस नेत्यांचे छायाचित्र नसल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक देऊन सातत्याने डावलले जात आहे, अशी नाराजी काँग्रेसने पुन्हा जाहीरपणे प्रकट केली आहे.

गुरुवारी उद्योग विभागाने अनेक दैनिकांमध्ये महाजाॅब्स या नव्या पोर्टलची जाहिरात प्रकाशित केली. त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे आहेत. यावर खासदार राजीव सातव, संजय निरुपम यासह काही नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“महाजाॅब्सची योजना चांगली आहे आणि काँग्रेसचे त्याला पूर्ण सहकार्य आहे. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा आहे,’ असे टि्वट सातव यांनी केले. दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भविष्यात काळजी घेण्याची खात्री दिलेली आहे. त्यामुळे हा विषय इथे संपलेला आहे, असे सांगून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी वादावर पडदा टाकला.

चूक मान्य, डावलले नाही : बाळासाहेब थोरात

‘आम्ही सदर चूक उद्योग विभागाचे मंत्री यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी चूक मान्य केली आहे. मात्र, यामुळे सरकारमध्ये समन्वय नाही, असे बिल्कुल नाही. काँग्रेसला डावलले जात नाही,’ असे महसूलमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...