आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भयावह होतेय कोरोना संक्रमण:रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांमध्ये केवळ 4 दिवसात 15% नी वाढ, 9 महिन्यानंतर आढळले सर्वात जास्त रुग्ण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तिसऱ्या लाटेच्या चाहुलीदरम्यान मुंबईमध्ये कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. एवढेच नाही तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 4 दिवसांत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 15% वाढ झाली आहे.

मुंबईतील जवळपास सर्वच कोविड केंद्रांमध्ये बेडची संख्या वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनी नॉन-कोविड वॉर्डचे कोरोना वॉर्डमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू केले आहे.

चार दिवसांत किती लोक दाखल झाले

दिवसदाखल झालेले रुग्ण
सोमवार574
रविवार503
शनिवार389
शुक्रवार497

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही रुग्णालयांमध्ये आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. दाखल झालेल्या काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनची लेव्हलही कमी असल्याचे दिसून आले आहे.

रुग्णालयात सध्या 3735 रुग्ण दाखल आहेत
सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार BMC अंतर्गत 30,565 कोविड बेडपैकी 12.2% (3,735) वर रुग्ण अ‍ॅडमिट आहेत. 2,720 ICU बेडपैकी 14% भरले आहेत. तर खाजगी रुग्णालयातील 5,192 कोविड बेडपैकी, 838 (16%) रुग्ण जनरल बेड आणि 180 (3%) आयसीयू बेडवर अ‍ॅडमिट आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात प्रकरणांमध्ये वाढ होत आहे आणि गंभीर प्रकरणांमध्ये वाढ सामान्यतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून दिसते.

42% फुल झाले नेस्को जंबो कोविड सेंटर
गोरेगावच्या जंबो कोविड केअर सेंटरमध्ये 26 डिसेंबरला सात रुग्ण दाखल झाले होते. आता ही संख्या वाढून 120 पेक्षा जास्त झाली आहे. सोमवारी दुपारपर्यंत येथे असलेल्या 1,172 बेडमधून 510(42%) बेडवर रुग्ण अ‍ॅडमिट होते. डीन डॉ नीलम एंड्राडे यांनी म्हटले की, ते 10 जानेवारीपर्यंत सर्व 2,738 बेड सक्रिय करण्याची योजना आखत आहेत आणि दररोज आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत. आयसीयूमध्ये एका आठवड्यापूर्वी चार ते पाच रुग्ण दाखल होत होते. आता ही संख्या वाढून 20 झाली आहे. आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट रुग्णांमध्ये ऑक्सीजन लेव्हल कमी असल्याचे दिसत आहे. मात्र कुणीही मॅकेनिकल व्हेटिलेटर सपोर्टवर नाही. ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही, तेच जास्त लोक येथे येत आहेत.

BKC च्या जंबो सेंटरमध्ये एका दिवसात 100 रुग्ण अ‍ॅडमिट झाले
रविवारी सुरू झालेल्या बीकेसीच्या जंबो सेंटरमध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण अ‍ॅडमिट झाले आहेत. डीन डॉ. राजेश डेरे म्हणाले की, यामध्ये पॉझिटिव्ह लोकांसोबतच संक्रमित झालेल्या एसिमटोमेटिक अंतरराष्ट्रीय प्रवाशांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने एक एंजेंसीला लवकरच येथे आयसीयू सुरू करण्याची जबाबदारी दिली आहे.

9 महिन्यानंतर मिळाले सर्वात जास्त संक्रमित रुग्ण
मुंबईमध्ये सोमवारी कोरोना संक्रमणाचे 8,082 नवीन प्रकरणे समोर आले. जे 18 एप्रिल 2021 नंतर एका दिवसाचा सर्वाधिक स्तर आहे. या दरम्यान आजारामुळे अजून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ओमायक्रॉनचे 40 नवीन प्रकरणे समोर आले आहेत. ज्यामुळे महानगरात ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या वाढून 368 झाली आहे. मुंबई महानगरपालिकेनुसार, आता शहरात 8,07,602 कोरोना संक्रमित आहेत. तर मृतांची संख्या वाढून 16,379 झाली आहे. 8,082 नवीन प्रकरणांमधून 7,273 (90 टक्के) मध्ये आजाराचे लक्षण नव्हते आणि केवळ 574 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 71 रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर आहे.

बातम्या आणखी आहेत...