आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुश्रीफ प्रकरणामध्ये आता किरीट सोमय्यांचीच न्यायालयीन चौकशी:न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली?

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षातील विविध नेत्यांच्या कथित घोटाळ्यांचा पर्दाफाश करून सतत चर्चेत राहणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली, याच्या चौकशीचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश याप्रकरणी चौकशी करतील. न्यायालयीन कागदपत्रे मिळवण्याच्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे हे निर्देश म्हणजे किरीट सोमय्यांसाठी मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावर किरीट सोमय्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यावर तूर्तास कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. उच्च न्यायालयाने २४ मार्चपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...