आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी सुरतला गेलेले विधान परिषद आमदार रवींद्र फाटक, मध्यस्थी करणारे माजी मंत्री संजय राठोड आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह एकूण ८ मंत्री यांच्यासह ४६ जण गुवाहाटीला गेल्याने शिंदेंच्या गटाने अंकांच्या राजकारणात बाजी मारली. विशेष म्हणजे वर्षा सोडताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही सेनेचा बालेकिल्ला समजल्या गेलेल्या दादर-कुर्ला या मतदारसंघातील सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाला मिळाल्यावर सेनेचे भगदाड मोठे झाले.
आमदारांना भावनिक साद घालून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले. त्यानंतर काहीच वेळात शिवसेना भवनासह सेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरचे आमदार सदा सरवणकर, महेश कुडाळकर यांच्यासोबत सेनेचे माजी गृहमंत्री दीपक केसरकर मुंबई सोडून सुरतला पोहोचले होते. गुरुवारी सकाळी सेनेने बोलावलेल्या बैठकीला आदित्य ठाकरे, उदय सामंत यांच्यासह केवळ १६ आमदार शिल्लक होते. यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीत सेनेचे ८ मंत्री, ३१ आमदार व अपक्ष तसेच सहयोगी ८ असे ४५ आमदार पोहोचले आहेत, तर ठाकरे यांच्याकडे ४ मंत्र्यांसह १६ आमदार उरल्याचे चित्र पहायला मिळाले.
शिंदे गटातील मंत्री : १. एकनाथ शिंदे २. शंभूराज देसाई ३. दादा भुसे ४. संदिपान भुमरे ५. गुलाबराव पाटील ६. अब्दुल सत्तार ७. बच्चू कडू ८. राजेंद्र यड्रावकर
आमदार : १.अनिल बाबर २. महेश शिंदे ३. शहाजी पाटील ४. महेंद्र थोरवे ५. भरतशेठ गोगावले ६. महेंद्र दळवी ७ प्रकाश अबिटकर ८. डॉ. बालाजी किणीकर ९. ज्ञानराज चौगुले १०. प्रा. रमेश बोरनारे ११. तानाजी सावंत १२. प्रकाश सुर्वे १३. बालाजी कल्याणकर १४. संजय शिरसाट १५. प्रदीप जयस्वाल १६. संजय रायमूलकर १७. संजय गायकवाड १८. विश्वनाथ भोईर १९. शांताराम मोरे २०. श्रीनिवास वनगा २१. किशोरअप्पा पाटील २२. सुहास कांदे २३. चिमणआबा पाटील २४. लता सोनवणे २५. प्रताप सरनाईक २६. यामिनी जाधव २७. योगेश कदम २८. मंगेश कुडाळकर २९. सदा सरवणकर ३०. दीपक केसरकर ३१. संजय राठोड.
अपक्ष आमदार : १. राजकुमार पटेल २. चंद्रकांत पाटील ३. नरेंद्र भोंडेकर ४. किशोर जोरगेवार ५. मंजुळा गावित ६. विनोद अग्रवाल ७. गीता जैन.
ठाकरे गटात शिल्लक मंत्री : १. उद्धव ठाकरे २. आदित्य ठाकरे ३. अनिल परब ४. उदय सामंत ५. शंकरराव गडाख (अपक्ष)
आमदार : १. अजय चौधरी २. सुनील प्रभू ३. रवींद्र वायकर ४. राजन साळवी ५. प्रकाश फातर्फेकर ६. सुनील राऊत ७. वैभव नाईक ८. रमेश कोरगावकर ९. कैलास पाटील १०. नितीन देशमुख ११. राहुल पाटील १२. संतोष बांगर १३. भास्कर जाधव १४. सुजित मिचणेकर १५. संजय पोतनीस
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.