आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाची दादागिरी:​​​​​​​उल्हासनगरमध्ये घराबाहेर उभ्या तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरु झाला तपास

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या उल्हासनगरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याची दादागिरी CCTV कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडिओ 1 जानेवारीच्या रात्रीचा असल्याचे बोलले जात आहे. जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये रस्त्याच्या कडेला काही तरुण उभे असल्याचे दिसत आहे. एवढ्यातच एक पोलिस कर्मचारी बाइकने तिथे पोहोचतो आणि रस्त्याच्या कडेला उभ्या तरुणांना मारहाण करतो.

शहरातील शहाड बिर्ला फाटक परिसरात ही घटना घडली. तरुणांना बेदम मारहाण करणारा पोलिस ठाण्यातील दंगल नियंत्रण पथकात तैनात असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांचे या प्रकरणी स्पष्टीकरण
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता ठाणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणात 31 डिसेंबरच्या रात्री संपूर्ण शहरात नाकाबंदी होती आणि हे सर्वजण कोविड नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण दारूच्या नशेत होते आणि डीजेच्या तालावर नाचत होते. अटक करण्यात आलेल्या तरुणावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...