आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदापात्रात दोन बहिणी बुडाल्या:माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील घटना; एकीला वाचवताना दुसरीचाही मृत्यू

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे काका मावशीकडे आलेल्या 2 मावस बहिणींचा गोदावरीपाञात ​बडुन मृत्यु झाला. हि हृदयद्रावक घटना (ता. 3) शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे यांच्याकडे 15 दिवसांपुर्वी दिपाली गंगाधर बरवडे (वय 20, रा. मन्यारवाडी ता. गेवराई) आली होती. तर सोमेश्वर शिंगाडे यांच्याकडेही स्वाती अरुण चव्हाण (वय 12, रा. आनंदवाडी, ता. परतुर जि. जालना) ही 6 दिवसांपुर्वी आली होती.

आज (ता. 3) महातपुरी गावालगत असलेल्या गोदावरी नदीपाञात मावशी सोबत कपडे धुण्यासाठी सकाळी 9 वाजता गेल्या. त्यानंंतर वाळु माफीयांनी गोदापाञात रस्ता केला होता. या मावस बहिणी पाण्यातील असलेल्या रस्त्यातूनन चालत असताना खड्डृ्यात स्वातीचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दिपाली गेली असता पाण्यात घाबरलेल्या स्वातीने दिपालीच्या गळ्याला घठ्ठ मिठी मारली त्यामुळे दिपालीलाही कसलीच हालचाल करता आली नाही. त्या दोघी पाण्यात बुडाल्याने गोदापाञात असलेल्या महिलांनी आरडा-ओरड केली माञ दोघी पाण्याच्या तळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पाण्यात घेतला शोध

गावातील अनेक लोकांनी पाण्यात शोध घेतला असता काही काळानंतर एकाला बुडालेल्या मुलीचा पाय लागला त्यामुळे दोघींचा शोध लागला. त्यांना बाहेर काढून तत्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाॕ. गजानन रुद्रवार यांनी दोघींनाही मृत घोषित केले. दोन्ही मावस बहिणीचा मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...