आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:आमदार अबू आझमी यांना आयकरची नोटीस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून सातत्याने भाजपविरोधात बोलणारे सपाचे आमदार अबू असीम आझमी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. आयकर विभागाने १६० कोटी रुपयांच्या आयकर अनियमिततेप्रकरणी आझमी यांना नोटीस पाठवली आहे. २० एप्रिल रोजी आझमी यांना आयकरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आझमी यांच्या जुन्या मित्रांमध्ये गणेश गुप्ता नावाच्या व्यावसायिकाचाही समावेश आहे. गुप्ता यांच्या पत्नी विनायक ग्रुपमध्ये भागीदार आहेत. सर्वेश अग्रवाल आणि समीर दोशी हेही या कंपनीत भागीदार आहेत. विनायक ग्रुपमध्ये कोट्यवधी रुपयांची करचोरी झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या वाराणसी शाखेला मिळाली होती. त्यामुळे या कंपनीची चौकशी सुरू झाली. या कंपनीच्या नफ्यातील काही हिस्सा सपा आमदार आझमी यांनाही गेला, अशी माहिती आयकर विभागाच्या तपासादरम्यान समोर आली. विनायक समूहाने २०१८ ते २०२२ या वर्षात सुमारे १६० ते २०० कोटींचे उत्पन्न मिळवले. यातील सुमारे ४० कोटी रुपये चुकीच्या मार्गाने आझमी यांच्यापर्यंत पोहोचले. हवालाद्वारे आझमीपर्यंत कोट्यवधी रुपये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.