आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक कर्ज:कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत ८ लाख रुपयांपर्यंत वाढ; अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम योजनेतही लाभ

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती.

मलिक म्हणाले, राज्य शासनाकडून १८ ते ३२ वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्याच्या पुढील सहा महिन्यांनंतर ५ वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्याने या कर्जाची परतफेड करावयाची असते. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधावा. महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https:/malms.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम योजनेतही लाभ
केंद्र शासनाच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येते. या योजनेतून लाभासाठी शहरी भागाकरिता विद्यार्थ्यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रुपये तर ग्रामीण भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ९८ हजार रुपये इतकी आहे. यासाठीही विद्यार्थी अर्ज करू शकतात, असे मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...