आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये भरघोस वाढ झाल्याने मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व उद्योगपती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीचा विचार करता आता ते जगातील आठवे सर्वात श्रीमंत ठरले आहेत.
ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता ९९.७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. शिवाय ते पुन्हा एकदा अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या पुढे गेले आहेत. गौतम अदानी यांची सध्याची एकूण संपत्ती ९८.७ अब्ज डॉलर इतकी आहे. अदानी जागतिक पातळीवरील श्रीमंतांचा विचार करता नवव्या स्थानावर आहेत. टेस्लाचे सीईओ एलन मस्क २२७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील दुसरे श्रीमंत अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांची संपत्ती १४९ अब्ज इतकी आहे.
ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार अदानी या वर्षी फेब्रुवारीत अंबानींना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. अदानींची संपत्ती एका वर्षात सर्वाधिक १.७२ लाख कोटींनी वाढली आहे. तथापि, अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे त्यांची संपत्ती झपाट्याने घटली आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक स्तरांवरील वस्तूंच्या भाववाढीत रिलायन्स नफा कमावत आहे. या वर्षी सेन्सेक्समध्ये ३ जूनपर्यंत ४.२७ टक्के पडझड झाली आहे, तर रिलायन्सच्या शेअर्समध्ये १७.३७ टक्के वाढ झाली आहे. बीएसईमध्ये शुक्रवारी कंपनीचे शेअर २.०२ टक्के वाढून एका महिन्याच्या उच्च स्तरावर म्हणजे २,७७९.५० वर बंद झाले. ३१ डिसेंबर २०२१ रोजी ते २,३६८.१५ रुपयांवर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.