आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह 6 जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ:आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले -आषाढी वारीवर बंधने नाहीत, पण काळजी घ्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईसह राज्यातील 6 जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. 'राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे टेस्टची संख्या वाढवण्यात आली आहे. जनतेने गर्दीच्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. विशेषतः आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 15 लाख भाविक एकत्र येण्याचा अंदाज आहे. या वारीवर कोणतेही बंधन नाही. पण, सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन त्यात सहभागी झाले पाहिजे,' असे टोपे म्हणालेत.

काळजीची गोष्ट नाही

मुंबई पुणे, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने टेस्टची संख्या वाढविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. काल रविवार असल्याने टेस्ट कमी झाल्या असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जवळपास 3 ते 8 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असल्याने खबरदारी म्हणून टेस्टची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मास्क सक्ती नाहीच
रुग्ण वाढत असले तरी त्यात काळजीचा विषय नाही, कारण सिव्हेरिटी नाही, यामुळे मास्क सक्ती नसली तरी आवाहन केले आहे. लोकांनी स्वत: हून मास्क लावायला हवे असे म्हणत त्यांनी मास्क न घालणाऱ्यांना तो घालावा असे समजून सांगावे मात्र त्यांच्याकडून दंड वसूल करू नये असेही सांगितले आहे.

यदा दिंडी होणारच
मनोरंजन क्षेत्रातील लोक एकत्र आले असता त्यांतील अनेक जण कोरोना बाधित झाली. यामुळे 15 लाख लोक वारीसाठी एकत्र येणार आहेत. त्यांनी काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी. वारीची तयारी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वारीवर कोणतेही बंधन नसले तरी सर्वांनी काळजी घेऊन वारीत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केेले आहे.

बातम्या आणखी आहेत...