आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेक द चेन:लॉकडाऊन वाढला, लसीकरणाची ‘चेन ब्रेक’; 15 मे सकाळपर्यंत कडक निर्बंधांचे आदेश जारी

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | नेस्को येथील एमएमआरसी कोविड केंद्रावर लस घेण्यासाठी गुरुवारी उसळलेली गर्दी. - Divya Marathi
मुंबई | नेस्को येथील एमएमआरसी कोविड केंद्रावर लस घेण्यासाठी गुरुवारी उसळलेली गर्दी.
  • अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मंदावले

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध १ मेपर्यंत होते. मात्र आता त्याला मुदतवाढ देण्यात आली असून हे निर्बंध आता १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी सायंकाळी हे आदेश जाहीर करण्यात आले. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. ही भीषण स्थिती लक्षात घेऊन १३ एप्रिल रोजी एक आदेश जारी करत कठोर निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर गर्दी कमी होत नसल्याने २१ एप्रिल रोजी सुधारित आदेश काढत अत्यावश्यक सेवा वगळता निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. हे निर्बंध १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार होते.

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मुंबईत गुरुवारी मोठी झुंबड उडाली होती. सकाळी ६ वाजेपासून लसीकरण केंद्रांवर रांगा लागल्या होत्या, मात्र तुटवड्यामुळे अनेकांना लस न घेताचा माघारी परतावे लागले. मुंबई पालिकेने पुढचे तीन दिवस लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, ‘ब्रेक द चेन’अंतर्गतचे कडक निर्बंध १ मेपासून आणखी १५ दिवस म्हणजे १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहतील, असे आदेश गुरुवारी राज्य सरकारने जारी केले.

नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, सोलापुरात लसीकरण मोहीम थंडावली. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हात नागरिक दुपारपर्यंत उभे होते. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही मोठा समावेश होता. केंद्रांवर शारीरिक अंतराचे पालन केले जात नव्हते. परिणामी ही केंद्रे कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत ३५,४५८ नागरिकांना डोस
मुंबईत शासकीय व पालिकेची ६३ आणि खासगी ७३ लसीकरण केंद्रे आहेत. खासगी केंद्रांवर ३५ हजार ४५८ नागरिकांना केवळ दुसरा डोस देण्यात आला. ज्या नागरिकांनी पहिला डोस खासगी केंद्रावर घेतला आहे अशांनी केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, लस तुटवड्याुळे पुढचे तीन दिवस मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी जाहीर केले आहे.

नाशकात तुटवडा, नगरमध्ये वेग मंदावला
नाशिक,नगर जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. नाशिक महापालिकेने गुरुवारी ८,५०० व जिल्हा परिषदेकडून ३००० लस मागवून शहरातील एकूण ७२ केंद्रांवर ११,५०० लसी वितरित केल्या. नगर जिल्ह्याने गुरुवारी लसीकरणाचा साडेचार लाखांचा टप्पा ओलांडला.मात्र लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जळगाव-सोलापूरमध्ये तर गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे.

बातम्या आणखी आहेत...