आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पचायंत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये सदस्यसंख्या वाढवली होती. पण, ही वाढताना अंदाजीत लोकसंख्येचा आधार घेतला गेला. नियमाप्रमाणे मविआ सरकारने असे करणे चुकीचे होते, असे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले. याशिवाय, आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत वाढवलेली सदस्यसंख्या रद्द करण्याची विनंती केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. विरोधीपक्षनेते म्हणून त्यांचे कामच आहे. पण, विदर्भाचा पुळका आला केव्हापासून, असा सवाल त्यांनी केला. तसेच संजय राऊतांना आता झोप लागत नाही. त्यामुळे ते झोपेच्या गोळ्या घेतात आणि स्वप्न पाहतात, असा टोला भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकारच्या महापालिकेसह झेडपीच्या गट गण रचनेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद गट गण रचनेवर नियमाअंतर्गत घेतलेल्या आक्षेपांचा निपटारा करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, चार सदस्यांचा प्रभाग करण्याची मागणी भाजप नेते अजिंक्य माने यांनी केली.
महाराष्ट्रातील 13 महानगरपालिकाकरीता राज्य निवडणूक आयोगकडून मविआ सरकारने 30 सप्टेंबर 2021 रोजी अध्यादेश काढून कायद्यात केलेल्या बदलानुसार 3 सदस्यीय प्रभागरचना अंतिम करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्ग व महिला प्रारुप आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर प्रभाग रचना सदोष आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात म्हटले आहे.
लोकसभा प्रवास योजना
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजना हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या माध्यमातून संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जात आहे. या योजनेत भाजपने महाराष्ट्रात 16 जागांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. या 16 जागा शिवसेनेकडे आहे. या जागांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.
सर्व प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेली प्रभाग रचना, गट रचना सदोष असून तोडून-मोडून तयार करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य करून आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्या. त्यामुळे त्या रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्यात याव्या, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.