आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ पार्टी प्रकरण:राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नबाव मलिक यांच्या सुरक्षेत वाढ; NCB च्या रेडसह भाजपवर केले होते गंभीर आरोप

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील क्रूझवर झालेली ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने केलेली संपूर्ण कारवाई बोगस असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता नबाव मलिक यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मलिक यांना आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक यांच्या सुरक्षेसाठी चार बंदुकधारी जवान, पायलट कार अशा हाय सिक्युरीटीज प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या राहत्या घरी देखील चार जवान तैनात करण्यात आले आहे. पुर्वी मलिकांच्या सुरक्षेसाठी फक्त एक जवान तैनात असायचा. मात्र क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी मलिक यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

शाहरुखला टार्गेट करायचे हे आधीच ठरले होते - मलिक

एनसीबीने क्रूझवर टाकलेला छापा बोगस असून, क्रूझवरून कोणत्याही प्रकारे ड्रग्ज सापडलेले नाही. ड्रग्ज साठ्याचे फोटो एनसीबी कार्यालयातील आहेत. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला पद्धतशीरपणे यात फसवण्यात आले. शाहरुखला टार्गेट करायचे हे आधीच ठरले होते आणि त्यानुसार पुढे संपूर्ण कारवाई केली गेली.

भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला व स्वत:ला खासगी गुप्तहेर म्हणवणारा किरण गोसावी हे दोघे कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांसोबत कसे काय सहभागी झाले होते?, असा गंभीर सवालही मलिक यांनी विचारला होता.

बातम्या आणखी आहेत...