आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची अनोखी सुरुवात:मुंबई सेंट्रल स्थानकावर सुरु झाले पहिले पॉड हॉटेल, कॅप्सूलसारख्या आरामदायी खोल्यांमध्ये थांबू शकतील प्रवासी

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही जागा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. हे 3000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. - Divya Marathi
ही जागा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. हे 3000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे.

भारतीय रेल्वेने बुधवारपासून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल किंवा पॉड रूम सुरू केली आहे. जर एखाद्या प्रवाशाला ट्रेनच्या प्रवासानंतर थकवा जाणवत असेल तर तो स्टेशनवरच या पॉड हॉटेलमध्ये राहून विश्रांती घेऊ शकेल. आधुनिक सुविधांनी सुसज्ज, कॅप्सूल-खोल्यांचे हे हॉटेल 12 ते 24 तास प्रवासी राहू शकतील. येथे राहण्याचे भाडे 999 रुपये ते 1999 रुपये असेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन त्याचे भाडे खूपच कमी ठेवण्यात आल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

रेल्वेने याला अर्बनपॉड असे नाव दिले आहे. यात जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत.
रेल्वेने याला अर्बनपॉड असे नाव दिले आहे. यात जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, खासगी पॉड्सचे भाडे 1249 ते 2499 रुपयांपर्यंत असेल. जर तुम्ही मुंबईला छोट्या व्यावसायिक सहलीसाठी भेट देत असाल, किंवा लहान मुलांचा गट फिरायला घेऊन जायचे असेल, तर हे हॉटेल राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. रेल्वे मंत्रालयाने या जागतिक दर्जाच्या पॉडची काही छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहेत.

हे हॉटेल अतिशय सुंदर सजवलेले आहे.
हे हॉटेल अतिशय सुंदर सजवलेले आहे.

या देशांमध्ये आधीच 'पॉड हॉटेल्स'
IRCTC अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या या पॉड हॉटेलमध्ये एकूण 48 खोल्या आहेत. या खोल्यांची लांबी 7 फूट, रुंदी व उंची 4 फूट आहे. 'पॉड्स'मध्ये हॉटेलप्रमाणे आरामदायी पलंग आहे. जगातील पहिले असे हॉटेल जपानमध्ये सुरू झाले. आता जपान, रशिया, अमेरिका, यूके, नेदरलँड, सिंगापूर आणि मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणात पॉड हॉटेल्स आहेत. अर्बनपॉड हे भारतात उघडलेल्या पहिल्या बुटीक पॉड हॉटेल्सपैकी एक आहे.

एक प्रवासी येथे 12 ते 24 तास थांबू शकतो.
एक प्रवासी येथे 12 ते 24 तास थांबू शकतो.

पॉड हॉटेल म्हणजे काय?
पॉड हॉटेल्स कॅप्सूलच्या आकाराच्या खोल्या असतात. या सर्व खोल्या वातानुकूलित आहेत. सध्या पॉड हॉटेलची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ज्यांच्या किंमती आणि वैशिष्ट्ये भिन्न आहेत. मुंबई स्टेशनवरील पॉड रूम क्लासिक पॉड, एक्सक्लुझिव्ह लेडीज पॉड, एक्सक्लुझिव्ह लेडीज पॉड आणि सूट पॉडमध्ये विभागल्या आहेत. त्याआधारे त्याची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

हॉटेलमध्ये या असतील सुविधा

  • कॉमन एरियामध्ये लोकांना बसण्यासाठी जागा तयार करण्यात येणार आहे.
  • येथील स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
  • पॉड हॉटेलच्या खोल्यांमध्ये बाथरूम नसेल.
  • खोल्यांमध्ये सॅटेलाइट टीव्ही, मोफत वाय-फाय असेल.
  • खोलीच्या बाहेर बॅगेज लॉकर, पॉवर सॉकेट, यूएसबी पोर्ट आदी सुविधा असतील.
  • पॉड हॉटेलमध्ये 2 बिझनेस सेंटर डेस्क देखील असतील जेथे कोणी कॉफीसह त्यांचे काम करू शकेल.
  • या हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या कॅफे एरियामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत व्यक्तीला जेवणही दिले जाणार आहे.
या कॅप्सूल रूममध्ये लोकांच्या गोपनीयतेचीही काळजी घेण्यात आली आहे.
या कॅप्सूल रूममध्ये लोकांच्या गोपनीयतेचीही काळजी घेण्यात आली आहे.

हॉटेल 3000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे

IRCTC ने खुल्या निविदा आधारावर 9 वर्षांसाठी POD संकल्पना रिटायरिंग रूमची स्थापना, संचालन आणि व्यवस्थापन करण्यासाठी कंत्राट दिले आहे. ही जागा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. हे 3000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे.

बातम्या आणखी आहेत...