आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मोबाइल आणि ब्राॅडबँड इंटरनेट स्पीडमध्ये भारताचा क्रमांक पुन्हा खराब झाला आहे. दोन्हीमध्येही त्याला एक-एक स्थानाचे नुकसान झाले आहे. ऊकलाच्या २०२० ग्लोबल इंटरनेट स्पीडटेस्ट इंडेक्समध्ये भारत मोाबाइल इंटरनेट स्पीडमध्ये १३९ देशांत १२९ व्या क्रमांकावर आहे. ब्रॉडबँड स्पीड प्रकरणात १७६ देशांत ६५ व्या क्रमांकावर आहे. कतार मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये दक्षिण कोरिया आणि यूएई वगळता पहिल्या क्रमांकावर आला आहे.
भारतात मोबा. डाऊनलोडची सरासरी स्पीड
हा ४.४% घटून १२.९१ एमबीपीएस आहे. नोव्हेंबरमध्ये हा १३.५ एमबीपीएस होता. असे असले तरी देशात मोबाइल अपलोडच्या स्पीडमध्ये किरकोळ सुधारणा पाहायला मिळाली आहे. ही जवळपास १.४% वाढून ४.९७ एमबीपीएस आहे. नोव्हेंबरमध्ये ४.९० एमबीपीएस होती.
मानकाच्या बदलानंतर देशांची संख्या वाढली
१ जानेवारी २०१९ पासून रँकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मानकांत बदल केला आहे. त्यानुसार, या रँकिंगमध्ये समाविष्ट होण्यासाठी कोणत्याही देशात कमीत कमी ३०० मोबाइल किंवा ब्रॉडबँड इंटरनेट यूजर असणे आवश्यक आहे. याआधी मोाबाइल युजर्सची संख्या ६७० आणि ब्रॉडबँड इंटरनेट यूजर्स संख्या कमीत कमी ३३३३ असणे आवश्यक होते. नव्या मानकानंतर रँकिंगमध्ये समाविष्ट होणाऱ्या देशांची संख्या वाढली.
शेजाऱ्यांत बांगलादेशापेक्षा चांगला
6 प्रमुख शेजारी देशांमध्ये भारतात मोबाइल इंटरनेट स्पीड केवळ बांगलादेशापेक्षा चांगली आहे. दुसरीकडे, मोबाइल इंटरनेट स्पीड प्रकरणात पाकिस्तान ६ क्रमांक घसरून ११४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. असे असतानाही तो चीन वगळता आपल्या अन्य शेजारी देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.