आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाऊस:मुंबई-ठाण्यासह उपनगरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटींग, येत्या तीन तासात मुंबईत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा  

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर कोकणात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाण्यासह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने थैमान घातले होते. पाऊस रात्रभर सुरू होता. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. शनिवारी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापुरात पावसानं थैमान घातलं. यामुळेच येथील नदी-नाल्यांना पूर आला. तर येत्या तीन तासा मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरामध्ये रात्रभर पावसाची बॅटींग सुरू होती. यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. तर उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

उत्तर कोकणात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला.  लोअर परेल, दादर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, मुलुंड, भांडुप या ठिकाणी संततधार पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. 

0