आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:भारत 2029 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ; माजी मुख्य आर्थिक सल्लागार यांचे मत

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी आली आहे. सध्याच्या विकास दरानुसार भारत २०२७ मध्ये जर्मनीच्या, तर २०२९ मध्ये जपानच्या पुढे निघून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल. भारतीय स्टेट बँकेच्या संशोधन अहवालानुसार, या वर्षी पहिल्या तिमाहीत विकास दर १३.५ टक्के राहिला आहे. या दराने भारत या आर्थिक वर्षात सर्वात वेगाने वाढ होणारी अर्थव्यवस्था ठरण्याची शक्यता आहे. माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद विरमानी यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा हा प्रवास पुढेही सुरू राहील आणि भारत आगामी काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल.

बातम्या आणखी आहेत...