आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणूक आज झाली तर काय?:भाजपला धक्का! महाराष्ट्रात 48 पैकी UPA ला 30, तर BJPला 18 जागांचा सर्व्हेचा अंदाज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोसभेच्या आज निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातल्या 48 पैकी फक्त 18 जागा भाजपला मिळतील, असा अंदाज आहे.

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, इंडिया टुडे आणि सी व्होटरने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून 'देशाचा मूड' जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

धक्कादायक निष्कर्ष

इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या आश्चर्यकारक निष्कर्ष आले. या सर्व्हेत महाराष्ट्रात राजकीय स्थितीचेही मुल्यांकन करण्यात आले आहे. जर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. तर महाराष्ट्रात युपीएला 48 पैकी 30 जागा मिळतील. तर भाजपप्रणित एनडीला 18 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी कायम राहिल्यास ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपने 2019 मध्ये शिवसेनेसोबत एकत्र लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 42 जागांवर विजय मिळाला होता.

नितीश कुमारांचा फटका

सर्व्हेनुसार, बिहारमध्ये जर निवडणुका झाल्या, तर नितीश कुमार यांनी एनडीए सोडल्याचा भाजपला फटका बसू शकतो. तर यूपीए फायद्यात असू शकते. कारण, सर्वेक्षणात 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यानच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, 1 ऑगस्ट रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या असत्या, तर जेडयूसोबत असल्याने एनडीएला 543 जागांपैकी 307 जागा मिळाल्या असत्या. तर यूपीएला 125 जागा मिळाल्या असत्या तर इतरांना 111 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण, आता नितीशकुमार यांनी एनडीएपासून फारकत घेतल्याने आता परिस्थिती बदलली आहे. बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर निवडणुका झाल्या असत्या, तर एनडीएला थेट 21 जागा कमी मिळाल्या असत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असले तरी लोकसभा निवडणुका झाल्यास एनडीला स्पष्ट बहुमत मिळेल असे दिसतंय. मोदींना 330 जागा मिळण्याच्या शक्यता आहे. एनडीएला 2019 मध्ये 353 जागा मिळाल्या होत्या.

ईडीच्या कारवाईची देशभर चर्चा

सी व्होटरच्या सर्वेक्षणात ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर 38 टक्के लोकांनी होय आणि 41 टक्के नाही असे उत्तर दिले. तर 39 टक्के लोकांच्या मते देशातील जातीय वातावरण बिघडले आहे. 34 टक्के लोकांनुसार देशातील सलोखा वाढला आहे. 18 टक्के लोक हे न्युट्रल राहिले आहेत.

पंतप्रधानपदासाठी पुन्हा 'नमो'

देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल असा प्रश्न सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आला. यावेळी, 53 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सर्वेक्षणात राहुल गांधी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. 9 टक्के लोकांनी त्यांना मतदान केले. याशिवाय, केजरीवाल यांना 6 टक्के तर योगी यांना 5 टक्के आणि शहा यांना 3 टक्के मते मिळाली आहेत.

काँग्रेसला कोण पुढे नेऊ शकते

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 40 टक्के लोकांनी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे काम चांगले असल्याचे मानले, तर 34 टक्के लोकांनी त्यांची कामगिरी खराब असल्याचे म्हटले. इतकेच नाही तर काँग्रेसच्या सुधारणेबाबतही लोकांनी मत व्यक्त केले आहे. 23 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की केवळ राहुल गांधीच काँग्रेसमध्ये सुधारणा करू शकतात. याशिवाय 16 टक्के लोक या भूमिकेसाठी मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. राजस्थानचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट काँग्रेसची स्थिती सुधारू शकतात, असे मानणारे 14 टक्के लोक आहेत. त्याचवेळी, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सुधारू शकते, असा विश्वास केवळ 9 टक्के लोकांचा आहे.

बातम्या आणखी आहेत...