आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च २०२० पासून आजवर सर्वाधिक २९०% वाढ धातू क्षेत्रात राहिली. विशेष म्हणजे, ५ महिन्यांपूर्वीपर्यंत आयटी क्षेत्र आघाडीवर होते. धातूनंतर २३१% वाढ बेसिक मटेरियल, १८९% वाढ आयटी क्षेत्रात राहिली. खूप मागे पडलेल्या रिअॅल्टी क्षेत्रानेही आता वेग घेतला आहे. त्यात १९७% वाढ झालेली आहे.
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतषबाजीचे वातावरण आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ६० हजारांपार गेला. निफ्टीही १७,८५३ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. कोरोना आल्यानंतर २३ मार्च २०२० ला सेन्सेक्स २५,९८१ च्या नीचांकापर्यंत गडगडला होता. आता १८ महिन्यांत तो १३१% वधारला आहे. यादरम्यान बीएसईत नोंदणीकृत ८ हजारांवर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप २६१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. ते मार्च २०२० मध्ये १०१ लाख कोटींपर्यंत उरले होते. म्हणजे, लिस्टेड कंपन्यांचे मूल्य १६० लाख कोटींनी वाढले. विशेष म्हणजे, ४२ लाख कोटी रु. फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएससारख्या टॉप-१० कंपन्यांचे वाढले आहेत.
- बाजारातील या तेजीमागील कारण काय आहे?
लार्ज कॅप कंपन्यांनी नवी पातळी गाठल्याने सेन्सेक्स ६० हजारांपार गेला. या रॅलीमागे अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ - जागतिक बाजारांतून चांगले संकेत, एफआयआय व डीआयआयचा मजबूत भांडवल प्रवाह, कंपन्यांची उत्तम कमाई, कोरोनात घट आदी.
- तेजी राहील, की मार्केट रिस्क झोनमध्ये आहे?
शेअर्स महागले आहेत. यामुळे पुढे एक करेक्शन शक्य आहे. मात्र, आर्थिक घडामोडींत सुधारणा व कंपन्यांचे उत्पन्न वाढल्याने सकारात्मक कल कायम आहे.
- छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायला हवे?
बाजारात टिकून राहा. चांगली कमाई झालेल्या शेअर्समध्ये नफावसुली करता येईल. कमी दरांत मिळणाऱ्या चांगल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करून पोर्टफोलिअोला रिबॅलन्स करा. ब्ल्यूचिप कंपन्यांना प्राधान्य द्या.
- ही तेजी संपूर्ण बाजारात आहे का?
बाजार भलेही विक्रमी पातळीवर असले तरी, २०% पेक्षा कमी कंपन्यांचे शेअर सर्वकालीन उच्चांकावर आहेत. ५९% कंपन्यांचे शेअर आपल्या विक्रमी पातळीच्या २५% खाली आहेत. ३५% शेअर आपल्या उच्चांकाच्या ५०% पेक्षा खाली आहेत.
- भारत आणि जगात एकसारखा ट्रेंड आहे का?
जगभरात वाढ सुरू आहे. भारतीय बाजाराने इतर सर्व बाजारांना मागे टाकले आहे. स्थानिक पातळीवरील बंधनांमुळे चीन व हाँगकाँच्या बाजारांत घसरण सुरू आहे.
- नव्या रिटेल गुंतवणूकदारांची भूमिका काय?
गतवर्षी मार्चपासून आजवर २.७१ कोटी नवे रिटेल गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात आले आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये गुंतवणूकदारांची संख्या ४.०२ कोटी होती. ती गेल्या ३१ आॅगस्टपर्यंत ६.७३ कोटींवर गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.