आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8967 कोटी रुपयांचा व्यवसाय:भारतीयांनी एका वर्षात 1500 कोटी वेळा डाऊनलोड केले गेम; ‘5जी’तून व्यवसाय 30 हजार कोटींचा होईल

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील तरुणाई ऑनलाइन गेम्समध्ये मोठा रस घेत आहे. २०२२ मध्ये भारतात १५०० कोटी वेळा गेम्स डाऊनलोड केले. हे चीन आणि अमेरिकेनंतर जगात सर्वात जास्त प्रमाण आहे. अमेरिका, चीन आणि जपाननंतर जगाला भारतात ऑनलाइन गेम्सची सर्वात जास्त शक्यता दिसते. याचे सर्वात मोठे कारण तरुण लोकसंख्या आणि स्वस्त मोबाइल डेटा आहे. गेमिंग कॅपिटल फंड लुमीकाईनुसार, भारतात २०२२ मध्ये ऑनलाइन गेम्सचा व्यवसाय सुमारे ८९६७ कोटी रुपयांचा आहे. 5जी लाँचिंगनंतर मार्च २०२७ पर्यंत हा ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. नॉडविन गेमिंगचे व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले की, भारतात मध्यमवर्ग वाढत आहे. यामुळे ऑनलाइन गेमिंगचा बाजारही वाढेल.

रेवेनॅट इस्पोर्ट््सचे संस्थापक रोहित जगासिया म्हणाले, अॅप स्टोअरवरून चीनचे बॅटलग्राउंड गेम हटवण्याच्या भारत सरकारच्या आदेशानंतर उद्योगाला झटका बसला होता. मात्र, यामुळे आपली कमाई वाढली होती. लुमीकाईच्या संस्थापक सलोनी सेहगल म्हणाल्या, गुंतवणूकदार भारतात ऑनलाइन गेमिंगमध्ये बरीच गुंतवणूक करू इच्छितात. ऑनलाइन गेम करमणूक नव्हे तर कमाईचे साधन बनले आहे. गेम बनवण्यापासून खेळण्यापर्यंत पैसे मिळत आहेत. ई-स्पोर्ट्‌स आयोजित होत आहेत. त्यातून कोट्यवधी रुपये बक्षिसांची रक्कम असते. २९ वर्षीय सलमान अहमदने गेमर होण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. गेमर म्हणून तो दरमहा सुमारे १० लाख रु. कमावतो. त्याने चिनी मोबाइल कंपनी रेडमीपासून स्किन केअर कंपनी मामाअर्थपर्यंतच्या ब्रँडशी करार केले आहेत.

२३ वर्षीय सलोनी पवार ही भारतातील पहिली महिला आहे, जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित एखाद्या ई-स्पोर्ट्‌स स्पर्धेत भाग घेतला आहे. ही स्पर्धा २०१९ मध्ये थायलंडमध्ये झाली होती. ती म्हणते की, प्रथम कुटुंबाने साथ दिली नव्हती. मात्र, पैसे येत गेल्यावर त्यांना लक्षात आले की, यातही संधी आहे. हैदराबादमध्ये १८ ते २० नोव्हेंबरपर्यंत ८० लाखांच्या बक्षिसांच्या ३ ई-स्पोर्ट्‌स स्पर्धा मोबाइलद्वारे हजारोंनी पाहिली.

देशात २०२६ पर्यंत १०० कोटी स्मार्टफोन युजर, सध्या ९२ कोटी पबजी निर्मात्या कोरियन कंपनीचे भारतातील सीईओ सियान ह्युनिल सॉन म्हणाले, 5जीचा शुभारंभ भारताच्या ऑनलाइन गेमिंगला मोठा बाजार देईल. डेलोइटेनुसार, २०२६ पर्यंत भारतात १०० कोटी स्मार्टफोन असतील. अमेरिकी कंपनी मोगोचे रिचर्ड व्हेलन म्हणाले, आम्ही भारतात सर्वात मोठे विद्यापीठ ई-स्पोर्ट्‌स स्पर्धा घेतो. त्यात ४०० पेक्षा जास्त संघ सहभागी होतात.

बातम्या आणखी आहेत...