आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 कोटींचा निधी मंजूर, आराखड्याच्या मंजूरीस प्रतीक्षा:मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी राज्य सरकारची अनास्था

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष संपायला आले तरी सरकार हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा व मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे. या कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही मंत्रीमंडळ उपसमितीने अद्यापी कार्यक्रम आराखड्यास मंजूरीच दिलेली नाही, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहून निदर्शनास आणून दिले.

पत्रात म्हटले की, मुक्तीसंग्रामानिमित्ताने राज्यस्तरीय कार्यक्रमांचे तातडीने आयोजन करावे. ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या वर्षापासून दरवर्षी मंत्रालय तसेच विधानभवनात दरवर्षी ध्वजारोहण केले जावे. येत्या पावसाळी अधिवेशनात अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहात २ दिवस चर्चा करावी. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा.