आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:चीनच्या आदेशावरूनच भारत-नेपाळ सीमावाद; "रॉ’ चे माजी आर. एस. एन. सिंग यांचे मत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आर. एस. एन. सिंग 
  • नेपाळमध्ये हिंदू संस्कृती अविभाज्य भाग - आर. एस. एन. सिंग

चीनचे नेपाळमधील राजदूत यांच्या घरी झालेल्या बैठकीत पंतप्रधान ओलींना जीवदान मिळाले, तसा बीजिंगवरून आदेश असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, त्या बदल्यात त्यांच्यापुढे पर्याय ठेवले की, सीमा भागात चीनचे सैनिक तैनात करण्यास मदत करावी. तसेच चीन-नेपाळ इकॉनॉमिक कॉरिडॉर करण्यासाठी भारतीय सीमालगतचे भागावर नियंत्रण ठेवावे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेत “रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेचे माजी अधिकारी आर. एस. एन. सिंग यांनी “भारत-नेपाळ सीमावाद’ या प्रश्नावर आपले विचार व्यक्त करताना दिली.

भारताची चूक हीच की वामपंथीयांना आपल्या देशात विस्तारण्यास वाव दिला. बौद्धिक पातळीवर प्रोत्साहन दिले. राजकीय ताकदीच्या एका विदेशी महिलेने दिलेले प्रोत्साहन तसेच सीताराम येचुरी यांच्या पुढाकाराने वामपंथीयांना मिळालेली ताकत केवळ भारतापुरतीच मर्यादित राहिली नाहीतर तिचे लोण नेपाळपर्यंत पोहचले. त्यातूनच नेपाळमध्ये त्यांचे स्थान भक्कम झाले. काँग्रेसच्या पाठबळामुळेच ओली सरकार सत्तेवर आले आणि त्यांनी भारताविरोधात कारवाया सुरू केल्या. मागच्या केंद्र सरकारमधील राजकीय नेत्यांनी केलेले हे पाप असल्याचे ते म्हणाले.

भारतावरच अवलंबित्व: नेपाळचा भूगोल म्हणजे उत्तरेला तिबेटचे उंच पर्वत आहेत. १४०० किमी तिबेट बरोबरची सीमा अत्यंत दुर्गम असून तिथे सध्या चीनचा कब्जा आहे. भारताबरोबरची नेपाळची १८०० किमी सीमा आहे. नेपाळमध्ये एकूण भूभागापैकी फक्त ७ टक्के इतकीच उत्पादनक्षमता आहे. १८ टक्के भूभाग शेतीसाठी योग्य आहे. त्यामुळे नेपाळला भारतावरच अनेक गोष्टींसाठी अवलंबून रहावे लागते. त्यामुळे भारताशी वाद करून त्यांचेच नुकसान होणार आहे. नेपाळच्या जनतेला दगा देऊन सत्तेवर आलेले वामपंथी हे नेपाळच्या भल्याचा विचार करू शकणार नाही.चीनने ज्यावेळी तिबेटवर कब्जा केला, त्यावेळी नेपाळवर देखील ते कब्जा करतील, अशी भीती नेपाळवासियांना होती. त्यावेळी त्यांना सैनिकी बळ देण्याचे काम भारताने केले तसेच चीनच्या आक्रमणापासून थांबवले, ही बाब विसरता कामा नये, असेही त्यांनी सुनावले.

नेपाळमध्ये हिंदू संस्कृती अविभाज्य भाग

भारतीय हिंदू संस्कृतीनुसार नेपाळमध्ये सण आणि उत्सव साजरे होत असतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार धार्मिक व्यवहार होत असतात. कम्युनिस्ट माओवाद्यांनी हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी सत्तेवर आल्याबरोबर नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र जाहीर केले. चीनच्या मदतीने त्यांना हत्यारे आणि सामग्री पुरवली जात होती. त्यातून हिंदुत्ववाद कमजोर करण्यास सुरुवात झाली. हिंदू परंपरा आणि संस्कृती नष्ट करण्याचा त्यांचा हेतू आहे. मात्र, हिंदू संस्कृती नेपाळचा अविभाज्य भाग आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

0