आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांसोबत बैठक:कोरोनाच्या लढाईत उद्योगांनी राज्य सरकारला मदत करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढवणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे, अशी या लढाईत शक्य होईल ती सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव

ठाकरे यांनी शनिवारी उद्योगांना केले. कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्रालाही झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आतापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. शनिवारी ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला या काळात ज्या गोष्टींची गरज आहे, त्यात पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमणियन, सुनील माथूर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल उपस्थित होते.

उद्योग उपलब्ध करून देणार ऑक्सिजन
बैठकीत सर्व उद्योगपतींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जेएसडब्ल्यू , महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यू स्टार, एल अँड टी , इन्फोसिस, कायनेटिक इंजिनिअरिंग यांच्या प्रतिनिधींनी बोलताना विशेषत: ऑक्सिजन उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच त्यांच्या उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे, लसीकरण मोहिमा घेऊन जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सुरक्षित करणे यासाठी तातडीने पावले उचलत आहोत, असे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...