आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापारेषण:चेन्नईत महापारेषणला इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कार ; संचालक दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा इंडस्ट्री एक्सलन्स अॅवार्ड महापारेषणला प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. के. पोन्मुडी यांच्या हस्ते महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.

दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या वतीने शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी चेन्नईत आयोजित झालेल्या ३७ व्या इंडियन इंजिनिअरिंग कॉंग्रेसच्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा थाटात झाला. तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. के. पोन्मुडी यांच्या हस्ते महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मभूषण डॉ. ए. सिवाथनू पिल्लई, दि इन्स्टिटयुशन ऑफ इंजिनिअर्सचे (इंडिया) अध्यक्ष डॉ. एच. ओ. ठाकरे, इंजि. चिन्मय डेबनाथ, इंजि. एस. कन्नन, डॉ. टी.एम.गुणराजा इंजि. के. एन. सिवाराजू, इंजि. आर.रामदोस उपस्थित होते. कंपन्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी व उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सांघिक व्यवस्थापन आणि कंपनीच्या शाश्वत व निरंतर प्रगतीसाठी काम करणाऱ्या कंपनीचा व नेतृत्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो. या पुरस्कारामुळे कंपनीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

चेन्नई : येथे दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या वतीने देण्यात येणारा इंडस्ट्री एक्सलन्स ऍवार्ड तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. के. पोन्मुडी यांच्या हस्ते स्वीकारताना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे. शेजारी महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे व अन्य मान्यवर.

बातम्या आणखी आहेत...