आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:उद्योगमंत्री उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे यांच्या स्पीड बोटीला अपघात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगमंत्री उदय सामंत ज्या स्पीड बोटीने सोमवारी अलिबागला जात होते ती मांडवा जेटीजवळील खांबाला आदळली. बाेटीत सामंत यांच्यासाेबत छत्रपती संभाजी राजे हेही उपस्थित होते. या अपघातात सुदैवाने दोघेही सुखरूप आहेत. किल्ले रायगडावर ३५० वा राज्याभिषेक सोहळा होणार असून त्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी सकाळी अलिबागला रवाना झाले. यादरम्यान मांडवाजवळ स्पीड बोटीच्या कॅप्टनचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. मात्र, या अपघातानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. यापूर्वीही त्यांची बोट समुद्रात बंद पडली होती. दुसऱ्या बोटेने त्यांना आणावे लागले होते.